लग्नात रसगुल्ला कमी पडल्याने राडा, 6 जण जखमी

उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका लग्नसोहळ्यात रसगुल्ले कमी पडल्याने मोठा राडा झाला.  हा राडा एवढा जबरदस्त की, यामध्ये 6 जणं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तहसील विभागात घडली आहे, शमासाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल शर्मा यांनी सांगितले की, बृजभान कुशवाह यांच्या घरी लग्नसमारंभ होता. दरम्यान एक व्यक्ती रसगुल्ला कमी पडल्याने काहीतरी बरळला. त्याच्या बोलण्यामुळे वाद निर्माण झाला, हा वाद एवढा वाढला की, यामध्ये झालेल्या मारहाणीत 6 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान देवी, योगेश, मनोज, कैलाश, धर्मेंद्र आणि पवन अशी जखमी झावलेल्यांची नावे आहेत. आग्रा येथील शमसाबादअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासकार्य सुरु केले आहे.