यूपीच्या तिघा तरुणांना शस्त्रांसह पकडले

431

उत्तर प्रदेशातून दोन देशी कट्टे आणि 14 जिवंत काडतुसे घेऊन मुंबईत आलेल्या तिघा तरुणांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील ही शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून ती कोणाला देण्यासाठी आणण्यात आली होती याचा पोलीस तपास करीत आहेत.

यूपीतील तीन तरुण शस्त्र घेऊन शीव पूर्वला येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक केदारी पवार यांच्या मागदर्शनाखाली कोळी, सपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने, अमित भोसले व पथकाने मिळालेल्या माहितीनुसार शीव परिसरात सापळा रचला. ती तिघे तरुण घटनास्थळावर येताच खबऱयाने हेच असल्याचे पोलिसांना खुणावले. त्यानुसार पथकाने तिघांवर झडप घातली. तिघांची अंगझडती घेतल्यावर एकाकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझिनमध्ये सात पितळी जिवंत राऊंड सापडले. दुसऱया अंगझडतीत देशी बनावटीचा कट्टा व कट्टय़ाच्या चेंबरमध्ये एक राऊंड लोड असल्याचे आढळून आले. तर तिसऱयाच्या जीन्सच्या खिशात सहा जिवंत काडतुसे सापडली. तिघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या