
उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. चंपावत येथील सुखीढांग रीठा साहेब मार्गानजीक एक बस दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सापडलेले सर्व प्रवासी एका लग्नाहून परतत होते, अशी माहिती मिळत आहे.
मंगळवारी सकाळी चंपावत जिल्ह्यापासून 65 किलोमीटर परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढले. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Uttarakhand | 14 people died after the vehicle they were travelling fell into a gorge near Sukhidhang Reetha Sahib road. The accident occurred early morning today when they were returning from a wedding ceremony: Kumaon DIG Nilesh Anand Bharne pic.twitter.com/aGidTX7AGX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 22, 2022
या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चंपावत येथे झालेली दुर्घटना अतिशय हृदयद्रावक आहे. यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मी माझी सहवेदना व्यक्त करतो, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
























































