Video – पंतप्रधान मोदी म्हणजे राम; लोकांनी त्यांचा जय जयकार करावा,भाजप मुख्यमंत्र्याचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम आहेत, ज्या प्रमाणे आज लोक रामाची पूजा करतात आगामी काळात लोक मोदींचीही रामाप्रमाणे पूजा करतील असा दावा उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथस सिंह रावत यांनी केला आहे. तसेच लोकांनी त्यांचा जय जयकार करावा असेही सिंह म्हणाले.

हरिद्वारमध्ये हंस फाऊंडेशनच्या नेत्र कुंभ कार्यक्रमात रावत बोलत होते. रावत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी चमत्कारी व्यक्ती आहेत. पूर्वी आपल्या देशाचा पंतप्रधान बाहेर गेल्यानंतर त्यांना कोणी विचारत नसे. आता पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्यासाठी मोठ मोठ्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष रांगेत उभे राहतात. तसेच पंतप्रधान मोदी हे राम आहेत. ज्या प्रमाणे द्वापर आणि त्रेता युगात भगवान राम आणि कृष्ण त्यांच्या कामामुळे लोक त्यांची पूजा करत, त्याच प्रमाणे आगमी काळात पंतप्रधान मोदींनाही लोक मानतील असा दावा रावत यांनी केला आहे.  पंतप्रधान मोदी ज्या प्रमाणे देशासाठी काम करत आहेत, त्यासाठी लोकांनी त्यांचा जय जयकार केला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.