
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. जोशीमठ ब्लॉकच्या उर्गम-पल्ला जखोला मोटर मार्गावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 10 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. गाडीत अकडलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशु खुराना, पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल यांच्यासह एसडीआरएफ, एनीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 12 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गाडीत आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. अपघातात तीनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाली की, यामागे वेगळे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, सध्या बचावकार्य आणि जखमींना रुग्णालयात पोहचवण्याचे काम प्राधान्याने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत बचावकार्य सुद्ध पातळीवर राबवत जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.


























































