उत्तराखंडमध्ये मदत कार्यासाठीचे हेलिकॉप्टर कोसळले, 3 जण ठार

310

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उत्तराखंड येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचे सामान घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशी जिल्हात कोसळले आहे. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. उत्तरकाशी येथे ढगफुटी झाल्याने पूर आला आहे. यामुळे पूरात अडकलेल्यांना मदतीचे सामान घेऊन हे हेलिकॉप्टर मोरीहून मोल्डी येथे निघाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण तीनजण होते. केबलमध्ये अडकल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याचे बोलले जात आहे.

उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. येथील आठ जिल्ह्यांमध्ये पूराने हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीनंतर नद्यांनी आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दरड कोसळून रस्त्यावर पडल्याने अनेक वाहने अ़डकली आहेत. उत्तरकाशी .येथील मोरी क्षेत्रात रविवारी ढगफुटी झाली होती. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. याच भागातील पूरग्रस्तांना मदतीचे सामान घेऊन हे हेलिकॉप्टर निघाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या