
‘व्हॅक्सिन फॉर ऑल’ मोहिमेअंतर्गत देशभरात मोफत लसीकरणाला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 80 लाखांवर नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंतची ही लस देण्याची विक्रमी कामगिरी आहे. यापूर्वी 1 एप्रिलला 48 लाख डोस देण्यात आले होते. दरम्यान, देशात आतापर्यंत 28.33 कोटी नागरिकांना डोस दिले आहेत.

























































