मी पक्षाशी एकनिष्ठ, राणेंसारखे तीन पक्ष बदलले नाहीत! वडेट्टीवार यांनी कडक शब्दात घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. ‘मी माझ्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मला कोणताही पक्ष चॉकलेट देऊ शकत नाही. राणे यांना तीन पक्ष बदलण्याचा अनुभव आहे. त्यांना जे वाटते ते त्यांनी करावे. माझी उगाच बदनामी करू नये’, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. वडेट्टीवार हे सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचं वक्तव्य राणे यांनी केलं होतं, त्यावर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मी कायम बहुजनांचा विचार केला. त्यांच्यासाठी कायम लढत राहणार. भाजपला बहुजनांशी काही देणं घेणं नाही. भाजपनं बहुजन नेतृत्व संपवण्याचे काम केले आहे. पंकजा मुंडे हे ताजे उदाहरण आहे. पंकजाताईना मी ऑफर देण्याचा प्रश्नच नाही. कुठे राहायचं, हा त्यांचा प्रश्न आहे’, असंही वडेट्टीवार म्हणले.