पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीचा चाकूने भोसकून खून, नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

वाढवणा येथून जवळच असलेल्या मौजे डांगेवाडी येथे हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा भोकसून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यानंतर वाढवणा पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मौजे डांगेवाडी येथील तुकाराम माधवराव पुड (वय 45) हे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी जात होते. अचानक गावातील महमद अझहर निजाम डांगे याने कोणतेही कारण नसताना त्यांच्या पोटात चाकूने भोसकले आणि पळून गेला. ग्रामस्थांनी तातडीने पोलीस ठाण्यात ही माहिती कळवली

पोलिसांनी मारेकरी महमद अजहर निजााा ममडांगे यास ताब्यात घेतले. मारेकऱ्याला आमच्या ताब्यात द्यावे यासाठी मयताच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित मारेकऱ्यावर कडक कारवाई करण्याचे अश्वासन दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डांगेवाडी येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, मयत तुकाराम माधवराव पुंड याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथे पाठवण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या