
बीड येथील एका सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारातच गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. न्यायालयातील एका खोलीत जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
विनायक लिंबाजी चंदेल (४८) असे सरकारी वकिलाचे नाव असल्याचे कळते. आज बुधवारी सकाळी न्यायालयात चंदेल यांनी जीवन संपवल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. वडवणी पोलीस ठाण्याच्या सपोनि वर्षा व्हागाडे घटनास्थळी पोहचल्या असून चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट देखील लिहिल्याचे कळते. पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असून या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आठ महिन्यापूर्वी आले होते.
वडवणीला सरकारी वकील विनायक चंदेल आठ महिन्यापूर्वी वडवणीच्या न्यायालयात रूजू झाले होते. आठ महिन्यापासून ते सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांची कारकीर्द देखील चांगली राहिली होती. आज सकाळी अचानक जीवन संपवण्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून यामागे नेमक काय कारण आहे याचा शोध सुरू आहे.