
गेल्या तीन आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जम्मू काश्मीर येथील वैष्णव देवीच्या दर्शनासाठी इच्छुक असलेल्या हजारो यात्रेकरुंना दिलासा मिळाला आहे. वैष्णव देवी देवस्थान मंडळातर्फे दरदिवशी जम्मू बाहेरील 500 यात्रेकरूंना प्रवेश देण्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.
सध्या दररोज दोन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येते. ज्यात जम्मू बाहेरील फक्त 100 जणांचा समावेश होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदीर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर अखेर 16 ऑगस्टपासून देवस्थान यात्रेकरुंसाठी खुले करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात फक्त दोन हजार यात्रेकरुंनाच प्रवेश दिला जात आहे. ज्यात जम्मू बाहेरील फक्त 100 यात्रेकरुंनाच प्रवेश दिला जात होता. आता ही 100 यात्रेकरुंची अट बदलून 500 यात्रेकरु इतकी करण्यात आल्याचे श्री वैष्णवदेवी देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी जाहीर केले.



























































