आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी तरुणाला अटक  

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एडिट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी एकाला वाकोला पोलिसांनी अटक केली. शाहबाज खान असे त्याचे नाव आहे. शाहबाजचा मोबाईल पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. त्याने नेमका कशासाठी तो व्हिडीओ स्टेटसला ठेवला याचा तपास वाकोला पोलीस करत आहेत. एडिट करण्यात आलेल्या व्हिडिओत छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबासमोर रडत असल्याचे आणि त्या व्हिडीओखाली छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी लिहिली होती.