सौंदर्य  खुलवणारी भेटवस्तू

खरंतर वर्षाचे 365 दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे मात्र गिफ्ट दिल्याशिवाय साजरा होऊ शकत नाही. अशावेळी गिफ्ट म्हणून सौंदर्य वाढविणारा दागिना द्यायला हरकत नाही. टॅन्झायर या ब्रँडचे हिऱयाचे वेगवेगळे डिझाईन असलेले दागिने नक्कीच चांगला पर्याय ठरतील.

प्रेमाचे प्रतिक म्हणून हिऱयाच्या दागिन्यांकडे पाहिले जाते. सोने आणि हिऱयाचा मिलाफ असलेले इअरिंग्ज अथवा हिरे जडवलेली नाजुकशी चेन तुमच्या खास व्यक्तीला भेट देऊ शकता.

आजकाल रोजच्या वापरासाठी लाइटवेट म्हणजेच कमी वजनाच्या दागिन्यांचा ट्रेंड आहे. यात डायमंड हूप्स इअरिंग्जना सध्या जास्त पसंती दिली जाते. कलाकुसर असलेले मोती जडवलेले सोन्याचे ईअरिंग्जही तुमच्या खास व्यक्तीला नक्की आवडतील.

आपल्या खास व्यक्तीच्या नावाचे हिरेजडीत आद्याक्षर असलेले पिंवा त्याच्या राशीनुसार योग्य हिरे जडवलेले पेंडंट हे या दिवसासाठी खास गिफ्ट ठरू शकतं.