वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम येथे जुनी इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम येथील जुनी इमारत कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये पश्चिम बंगाल येथील मालदा इथल्या मजुरांचा समावेश आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये हे मजूर काम करत होते आणि या इमारतीत राहत होते.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ तसेच एसडीआरएफची पथके रवाना झाली आहेत. इमारतीचा कोसळलेला भाग हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यात मृत आणि जखमींचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.