वर्धा अत्याचार प्रकरणातील दोषीस सक्तमजुरीसह 20 वर्षांचा सश्रम कारावास

वर्धा जिल्हयातील हिंगणघाट येथे अत्याचार प्रकरणातील आरोपीस सक्तमजुरीसह २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ७६ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याचा अतिरिक्त सध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आरोपीचे नाव सुभाष उर्फ गोलु देवराव पिटेकर (वय 34) रा. पिंपळगांव (माथनकर) ता. हिंगणघाट जि. वर्धा असे आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादीची अल्पवयीन मुलगी (वय 10 वर्ष) ही तिच्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. दरम्यान, आरोपीने मुलीला जबरदस्तीने स्वत:च्या घरी नेत घरात कोंडुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळुन आल्याने त्याच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. कोर्ट विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधिश विद्याधर बी. काकतकर यांच्या न्यायालयात सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. सदर प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून दीपक एम. वैद्य यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. त्यांनी शासनातर्फे 12 सरकारी साक्षदार तपासले. तपासी अधिकारी म्हणुन पोलिस उपनिरीक्षक अचलकुमार शांताराम मलकापुरे यांनी तपास पूर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा केले होते.