वसई-भाईंदर पूल सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार

501

पश्चिम रेल्वेच्या पुलाला समांतर असा वसई-भाईंदर पूल सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. भाईंदरच्या खाडीवर उभारण्यात येणारा हा पूल सहा पदरी असणार आहे.

मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी) हा पूल उभारला जाणार आहे. पाच किलोमीटर लांब आणि 30 मीटर रुंद असणाऱया या पुलाच्या बांधकामासाठी 1501 कोटी रुपये खर्च होणार आहे. वसई-भाईंदर येथून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी मुंबईला ये-जा करतात. या नव्या पुलामुळे त्यांचा येण्याजाण्याचा वेळ कमी होणार आहे. सुमारे दहा किलोमीटरचे अंतर वाचेल असा दावा एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी केला आहे.

भाईंदरहून वसईला जाण्यास लोकलला दहा मिनिटे लागतात, पण रस्तामार्गे वाहनाने गेल्यास एक तास लागतो. वसई-भाईंदर पुलाचा शेवट भाईंदरच्या सुभाषचंद्र चौकात, नायगावच्या बाजूने कॉन्टीनो रोड आणि पंजू आयलंड येथे असणार आहे. पंजू आयलंड येथून भाईंदरला येण्यास फक्त बोटीचाच एकमेव मार्ग आहे. 2007 सालामध्येच या प्रकल्पाची योजना होती, परंतु त्यासाठी लागणाऱया परवानग्या मिळत नसल्याने त्यावेळी तो सुरू झाला नव्हता. त्यावेळी पुलासाठी 300 कोटी रुपये खर्च येणार होता.

आपली प्रतिक्रिया द्या