
पुढील आठवडय़ात बुधवार 5 नोव्हेंबर रोजी ‘गुरुनानक जयंती’ निमित्त सार्वजनिक सुट्टी असली तरी पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी उद्यान बंद राहील. पालिकेने याबाबत मंजूर केलेल्या ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. दरम्यान, गेल्या आठवडय़ात सुट्टीबाबत झालेल्या गोंधळातून शुक्रवारी उद्यानाजवळ मोठी गर्दी झाली होती.
 
             
		




































 
     
    




















