शाकाहारी मंडळींसाठी महत्त्वाची बातमी, या गोष्टी अजिबात VEG नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसेंदिवस जगभरातील असंख्य मंडळी ही मांसाहार सोडून शुद्ध शाकाहारी बनत चालली आहे. जी मूळची शाकाहारी मंडळी आहे ती व्रतवैकल्य, उपवास करतात. अशा सगळ्या मंडळींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला शुद्ध शाकाहारी असल्याचे वाटते मात्र त्या नाहीयेत. या गोष्टी कोणत्या आहेत त्या जाणून घेतल्यास शाकाहारी मंडळींना फायदा होणार आहे.

पांढरी साखर ( White Sugar )
बहुतांशी मंडळी सकाळी चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतो. ही साखर स्वच्छ करण्यासाठी नॅचरल कार्बन हा घटक वापरला जातो. हा घटक प्राणांच्या हाडाच्या भुकटीपासून बनवलेला असतो.

sugar

वाईन (Wine)
आरोग्यासाठी वाईन उत्तम असे अनेकजण मानतात. वाईनही फळांपासून बनते असं मानलं जातं. मात्र अनेकांना ही गोष्ट माहिती नाहीये की वाईन स्वच्छ करण्यासाठी इजिनग्लास या घटकाचा वापर केला जातो. इजिनग्लास हे माशाच्या अवयवापासून बनवण्यात आलेले असते.

wine5

बिअर (Beer)
बिअर ही धान्यापासून बनवली जाते हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र वाईनप्रमाणेच बिअर स्वच्छ करण्यासाठी इजिनग्लास या घटकाचा वापर केला जातो. इजिनग्लास हे माशाच्या अवयवापासून बनवण्यात आलेले असते.

beer-can-use-as-fuel

तेल
तुम्ही शाकाहारी असाल आणि तेल विकत घेत असाल तर त्या पाकिटावर किंवा डब्यावर तेलामध्ये ओमेगा फॅट-3 हा घटक नाहीये ना हे तपासून घ्या. शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी ओमेगा फॅट-3 तेलात मिसळले जाते.

edibal-oil

दही (Curd)
दही हे दुधापासून बनलेले असते ही गोष्ट सर्वमान्य आहे. मात्र बाजारातून डबाबंदी दही विकत घेताना त्यावरील घटन तपासून पाहा. जर त्यामध्ये जिलेटीन मिसळलेले असेल तर मग ते दही शुद्ध शाकाहारी नसते.

curd-new-image