कोर्टाबाहेर टॉपलेस होत महिलेचे आंदोलन, अश्लीलता पसरवण्याचा पूर्वीही दाखल झालाय गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका महिलेने कोर्टाबाहेर येऊन टॉपलेस होत आंदोलन केले आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात ही घटना घडली आहे. या महिलेवर अश्लीलता पसरविण्यासंदर्भात याआधी देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा या महिलेचे टॉपलेस आंदोलन आता चर्चेचा विषय बनला आहे.

विगन आक्टिविस्ट अशी ओळख असणाऱ्या ताश पीटरसन (28) या महिलेने 2020 साली ऑस्ट्रेलिया मधील मार्केट परिसरात टॉपलेस होत प्रदर्शन केले होते. या प्रकरणात पर्थ मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी झाल्यानंतर या महिलेने पुन्हा एकदा कोर्टाबाहेर येऊन टॉपलेस होत आंदोलन केले. यावेळी या महिलेसोबत अजून एक महिला व एक पुरुष उपस्थित होते. हे तिघेही प्राण्यांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत.

यासंदर्भात ‘ताश’ने सांगितले की ‘मी डेअरी व्यवसायासंदर्भात खरं बोलण्याचा प्रयत्न करत आहे, डेअरी व्यवसायासाठी वापरण्यात येणारे प्राणी त्यांच्या पिल्लांसाठी रडत आहेत. त्यामुळे आपण त्यांचा आवाज ऐकायला हवा. प्राण्यांचा छळ थांबवा अशी मागणी करण्यासाठी ‘ताश’ने अर्धनग्न होत हातात फलक घेत आंदोलन केले. आपल्या आहारासाठी प्राण्यांना मारणे अनैतिक आहे, असे या फलकावर लिहिले होते.

2020 साली देखील केले होते प्रदर्शन

पर्थ येथील बोटशेड मार्केट मध्ये डिसेंबर 2020 ला ताश पीटरसनने तिच्या शरीरावर पांढरा व काळा रंग लावून आंदोलन केले होते. यासंदर्भात मंगळवारी न्यायालयात सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर ‘ताश’ने कोर्टाबाहेर येत पुनः एकदा टॉपलेस प्रदर्शन केले. यावेळी ताश पीटरसनने एक फलक हातात धरला होता ज्यावर लिहिले होते कि माणसाला दूध प्यायला मिळावे म्हणून गायींसोबत चुकीचे घडत आहे.

कोर्टात काय झाले?

कोर्टाला आपली बाजू मांडताना महिलेने सांगितले कि प्राण्यांच्या हिताच्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष आकर्षित होण्यासाठी मी माझ्या शरीरावर कलाकृती सादर केली होती. यासंदर्भात कोर्टाला महिलेचे सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया अकाउंट देखील दाखविण्यात आले.