ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांचे ‘सलीमनामा’ प्रकाशित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांवर, भारतीय चित्रपटांवर आधारित माहितीपूर्ण आणि लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. चित्रपटसृष्टीतील अंतर्गत जग, कलाकारांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे संघर्ष आणि रंजक किस्से अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत वाचकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ आहे. त्यांचे ‘सलीमनामा’ हे पुस्तक देवप्रिया पब्लिकेशन्सव्दारे नुकतेच प्रकाशित झाले असून बॉलीवूडचे अत्यंत दिग्गज आणि प्रतिभावान पटकथा लेखक सलीम खान (प्रसिद्ध लेखक जोडी ‘सलीम-जावेद’ मधील सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांचे वडील) यांच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर आधारित आहे. नुकतेच प्रकाशित झाले आहे.

पुस्तकातील मुख्य वैशिष्टय़े म्हणजे या पुस्तकात वाचकांना सलीम खान यांचा इंदूरमधील सुरुवातीचा काळ, मुंबईत अभिनेता बनण्यासाठी केलेला संघर्ष आणि पुढे एक यशस्वी पटकथा लेखक म्हणून त्यांनी मिळवलेले स्थान यावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. सोबतच सलीम खान यांचे कौटुंबिक आयुष्य, लेखक म्हणून त्यांची विचारसरणी आणि सिनेसृष्टीतील त्यांचे स्थान याबद्दल अनिता पाध्ये यांनी त्यांच्या खास शैलीत मांडणी केली आहे. सिनेप्रेमींसाठी आणि बॉलीवूडचा इतिहास जवळून जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण आहे.