
आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही थांगपत्ता लावता येणार नाही. असाच एक व्हिडीओ उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचा व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. याबाबत नुकतेच त्यांनी राज्यसभेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांनी सभागृहात आल्यानंतर सर्वांना वाकून नमस्कार केला आणि जे व्यक्त केले त्याने सभागृहही सुन्न झाले.
सोशल मीडियावर व्हिडीओच्या निमित्ताने विविध कमेंट केल्या जात असल्याने दुखावलेले अध्यक्ष जगदीप धनखड गुरुवारी सभागृहात भावूक झाल्याचे दिसले. सभागृहात आल्यानंतर सभापती अत्यंत दुःखी दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने उपराष्ट्रपतींनी दुःख व्यक्त केले. सभागृहात प्रवेश करताच धनखड यांनी सर्व सदस्यांना हात जोडून नतमस्तक झाले आणि जे काही बोलले, त्यामुळे काही काळ संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.
जगदीप धनखड म्हणाले, मला आजकाल पाहावे लागते मी कुठे नतमस्तक होऊ, कोणासमोर नतमस्तक होऊ, फोटोग्राफर कुठून फोटो घेतील आणि ट्विटर, इंस्टग्रामवर टाकतील याचा काही नेम नाही. खरंतर, ते सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या त्यांच्या एका व्हिडीओमुळे दु:खी झाले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नतमस्तक होऊन नमस्कार करताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले. त्यावर धनखड सभागृहात म्हणाले, मी सर्वांना सांगू इच्छितो की, कोणासमोर नतमस्तक होणे ही माझी सवय आहे. त्यावेळी माझ्यासमोर कोण आहे हे मी पाहत नाही. मात्र काहीवेळेला मर्यादेची सीमाच ओलांडली जाते, त्यावेळी वेदना होतात.
पुढे ते सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा उल्लेख करत म्हणाले, मी फार विनम्र माणूस आहे आणि अहंकार हा त्यांच्या आयुष्यातला कधीच भाग होऊ शकत नाही. पुढे म्हणाले, संस्कारांची खिल्ली उडवता कामा नये, आपल्या संस्कृतित वाकून नमस्कार करणे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्यात विनम्र असणे महत्वाचे आहे. या वेदना मला त्या लोकांनी दिल्या ज्यांचा मी कायम आदर करतो असेही धनखड म्हणाले.
























































