विकी-कतरिनाचं लग्न नक्की होणार का? विकीच्या जवळच्या व्यक्तिचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या आहेत. विकी व कतरिना लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या दोघांनीही कधीच त्यांच्या अफेयरबाबत अधिकृतरित्या सांगितलेले नाही. मात्र दोघांच्या घरात लगीन घाई सुरू असल्याच्या बातम्यांना जोर आला आहे.

कतरिना व विकी हे येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचा चर्चा आहेत. राजस्थानमधील एक राजवाडा त्यांनी लग्नासाठी तीन दिवस बुक केलेला आहे. 7 ते 9 डिसेंबर पर्यंत त्यांच्या विवाहसोहळा पार पडणार आहे, अशा चर्चा रंगत आहेत.

याच दरम्यान विकीच्या जवळच्या व्यक्तिने या लग्नाच्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. विकी कौशल याची मावसबहीण डॉ. उपासना वोहरा यांनी असा कोणताही समारंभ होणार नसल्याचा दावा केला आहे.

जर लग्न खरोखर होणार असेल, तर ते दोघंही तसं जाहीर करतील. पण, ही माध्यमांनी पसरवलेली अफवा आहे. बॉलिवूडमध्ये अशा अफवा उठतच राहतात. मी काही दिवसांपूर्वीच याबाबत विकीशी बोलले. पण, त्याने तसं काहीही सांगितलेलं नाही, असा दावा डॉ. वोहरा यांनी केला आहे.

दुसरीकडे, हा विकी आणि कतरिनाचाच बेत असून नातेवाईकांकरवी हे लग्न नाकारण्याचा दावा करवण्यात येत आहे. जेणेकरून लग्नासाठी आवश्यक असलेली गुप्तता आणि खासगीपण जपता येऊ शकेल, असा अंदाज बॉलिवूडमधील काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.