युद्ध प्रसंगांचे हुबेहूब चित्रण

‘सॅम बहादूर’साठी रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागणाऱया वाहनांची खरेदी

विकी काैशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशातील पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि हिंदुस्थानी लष्कराच्या असीम शौर्याला समर्पित आहे. यामध्ये विकी मुख्य भूमिका साकारत आहे.

‘सॅम बहादूर’ चित्रपटात युद्धासंदर्भात चार प्रमुख प्रसंग दाखविण्यात आले आहेत.  ते अचूक पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटातील महत्त्वाच्या युद्ध प्रसंगांच्या चित्रिकरणासाठी तोफा, क्षेपणास्त्र डागणारी वाहने, रणगाडे इत्यादींसह हजारो शस्त्र आणि युद्ध वाहनांची खरेदी करण्यात आली होती.

चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखनदेखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हिज’च्या बॅनरखाली केली आहे.  ‘सॅम बहादूर’ मध्ये विकी काैशलव्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘सॅम बहादूर’  येत्या 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.