Video : शॉट मारताना भाजप आमदार प्रवीण दरेकर कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांची फजिती कॅमेऱ्यात कैद झाली. सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार दरेकर यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह झाला आणि ते मैदानात उतरले. बॅट हातात घेऊन त्यांनी जोरात चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु पाय घसरला आणि ते जमिनीवर आदळले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.