Video – ‘सी व्हिजिल 21’… सागरी सीमांच्या रक्षणाचा प्रत्यक्ष सराव

navy

12 आणि 13 जानेवारी 2021 रोजी ‘सी व्हिजिल’चा दोन दिवसांचा कोस्टल डिफेन्सचा सराव घेण्यात आला. सी व्हिजिलमध्ये देशाची संपूर्ण किनारपट्टी आणि ईईझेडचा समावेश होता. तसेच शांतता, युद्धाचा काळ ते आपत्कालीन परिस्थितीत कसे काम करायचे याचा देखील सराव केला गेला.

 

या सरावामध्ये संपूर्ण किनारपट्टी सुरक्षा यंत्रणा तैनात करणे आणि सागरी सीमांचे रक्षण कशा प्रकारे अधिक मजबुतीने करता येईल हे होते. नौदल (आयएन) आणि तटरक्षक दल (सीजी) यांचा समावेश होता या सरावात होता. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात सागरी पोलीस आणि कस्टम विभागातील व्यक्ती देखील तैनात करण्यात आल्या. संपूर्ण किनारपट्टीवर नौदल आणि कोस्टगार्ड विमानांनी पाळत ठेवली होती. तसेच हेलिकॉप्टरने ऑफशोअर प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या विशेष ऑपरेशन्स कर्मचार्‍यांना सेवेत दाखल केले होते.

बंदरं समुद्री वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र बनत असल्याने, बंदरांच्या सुरक्षा यंत्रणेची सरावादरम्यान पडताळणी करण्यात आली होती आणि आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व बंदरांच्या आपत्ती व्यवस्थापन योजनांचे मूल्यांकन केले गेले. राज्य पोलीस दल, भारतीय नौदल मरीन कमांडो आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाच्या कमांडो यांच्याकडून सागरी दहशतवादाच्या घटनांचा सामना करण्यासाठी प्रात्यक्षिक प्रयोग केले गेले.

या सरावाने नॅशनल कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन अँड इंटेलिजन्स (एनसी 3 आय) नेटवर्क नावाच्या तांत्रिक देखरेखीच्या पायाभूत सुविधांनाही मान्यता दिली. गुरुग्राममधील माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण केंद्र (आयएमएसी) आणि आयएन आणि सीजी स्थानकांमधील त्याच्या विविध नोड्सचा वापर पाळत ठेवणे आणि माहिती प्रसार यंत्रणेत समन्वय साधण्यासाठी केला गेला.

सहभागी असलेल्या विविध सुरक्षा एजन्सींमधील सहकार्य व समन्वय हे तटवर्ती संरक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे आश्वासक चिन्ह आहे आणि सागरी क्षेत्रामध्ये किनारपट्टी संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या