Video – उपमुख्यमंत्र्यांनी फडकवला उलटा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत चक्क उलटा झेंडा फडकवला आहे. पाठक फडकवत असलेल्या झेंड्यात वर हिरवा रंग तर खाली केशरी रंग होता. त्यांचा असा उलटा झेंडा फडकवतानाचा व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.

”उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी देशाचा तिंरगा उलटा फडकवला आहे. वर हिरवा व खाली केशरी रंग होता. देशाला उलटा पुलटा करता करता आता यांनी झेंड्याला पण उलटा करून टाकला. सांगा यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालायला हवा की नाही”, असे ट्विट उत्तर प्रदेश काँग्रेसने केले आहे.