
सामना प्रतिनिधी । पालघर
मुंबई सेंट्रल येथून सुरतकडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या मद्यपिला प्रवाशांनी अद्दल घडवली. फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
फ्लाईंग राणी एक्सप्रेसमधील जनरल डब्ब्यात बसण्याच्या जागेवर हा मद्यपी बूट घालून बसला होता. त्याला पाय खाली घेण्यास सांगितले असता त्याने शिवीगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हे पाहून प्रवासी संतापले. त्यांनी या दारुड्याला चोपले व पालघर रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. दारुड्याचे नाव सर्वेंन गोर असल्याचे सांगण्यात आले आहे.























































