ताडोबात पर्यटकांनी वाघाचा रस्ता अडवला, चिडलेल्या वाघाने काय केले; पाहा व्हिडीओ

3430

वाघाचा मार्ग रोखणाऱ्या गाईड आणि जिप्सी चालकावर ताडोबा प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सुभाष गऊत्रे या गाईडचा आणि जिप्सी चालक गौरव भगत यांचा समावेश आहे. या दोघांवर ही बुधवार दुपार पासून ताडोबात प्रवेश करण्यास बंदी लावण्यात आली आहे. MH 34 AM-4096 या नंबरची जिप्सी चौकशीत दोषी आढळून आली असून कारवाई करण्यात आलेले दोन्ही व्यक्ती याच जिप्सी वर कार्यरत होते.

समाज माध्यमांवर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीने वाघाची वाट अडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. धक्कादायक म्हणजे पर्यटकांनी वाट रोखून धरल्याने चिडलेल्या या वाघाने हल्ला करण्याचे (charge) संकेत दिले ज्यामुळे पर्यटकांची काही वेळ घाबरगुंडी देखील उडाली होती. वाघ जिप्सी वर चाल करून गेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवणाऱ्या या ताडोबातील गाईड आणि जिप्सी चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या