आरटीआय अपीलसाठी व्हिडिओ लिंकची सुविधा! पालिकेची हायकोर्टात माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन मुळे नागरिकांना सुनावणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास त्रास होत असल्यामुळे आरटीआय अंतर्गत दाखल झालेल्या सर्व अपीलांवर तूर्तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

आरटीआय अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलांवरील पहिल्या सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहून युक्तिवाद करण्याबाबत पालिकेने सूचना दिल्या होत्या. मात्र लॉक डाऊन मुळे प्रत्येकाला उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याविरोधात अ‍ॅड. मयूर फरिया यांनी जनहित याचिका दाखल केली होती त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बीएमसीच्या संबंधित वॉर्ड कार्यालयापर्यंत प्रवास करणे शक्य होणार नसून त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. असा युक्तिवाद याचिकाकत्र्यांनी केला. आज पालिकेच्यावतीने अ‍ॅड. यमुना पारेख यांनी बाजू मांडली. त्यावर त्यांनी माहिती देताना सांगितले की ही सुविधा सर्वांनाच देण्यात आली असून कोरोना कालावधी पुरती मर्यादित आहे.