ट्रेंड – कढईचा जुगाड भारी पडणार

वाहतूक पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी एका तरुणाने हेल्मेटऐवजी डोक्यावर चक्क कढई ठेवली आणि शांतपणे बाईकवर बसून प्रवास केला. हा विचित्र, पण भन्नाट जुगाड पाहून नेटिझन्सना हसू आवरत नाहीये. त्याचवेळी अनेकजण तरुणाच्या कृत्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.  व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल झाला असून तो एक्सवर  ‘कर्नाटक पोर्टपहलिओ’ या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. बंगळुरू ट्रफिक पोलिसांनीही या व्हिडीओकडे लक्ष दिले आहे. त्यांनी हा व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक सिटी ट्रफिक पोलीस ठाण्याकडे पाठवला असून, अशा प्रकारच्या जोखमीच्या कृ२तींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, ‘हेल्मेट हे जीवरक्षक आहे; व्हायरल रीलसाठी नव्हे.’