
छत्तीसगढमधील सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या एका तरुणाला कानाखाली वाजवली आहे. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाचा फोन देखील फोडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर त्या रणबीर शर्मा यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच सनदी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील या घटनेचा निषेध केला आहे.
जिल्हाधिकारी रणबीर शर्मा हे शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेत असताना त्यांना रस्त्यावर दोन तरुण दिसले. त्यांनी एका तरुणाला हटकले. तो तरुण त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. मात्र शर्मा यांनी काहीच ऐकून न घेता त्याच्या हातातील फोन फोडला. त्यानंतर त्याच्या कानाखाली देखील मारली. ऐवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी पोलिसांना देखील त्याला दांड्याने मारायला सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणबीर शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
The IAS Association strongly condemns the behaviour of Collector Surajpur, Chhattisgarh.
It is unacceptable & against the basic tenets of the service & civility.
Civil servants must have empathy & provide a healing touch to society at all times, more so in these difficult times.— IAS Association (@IASassociation) May 23, 2021
छत्तीसगढचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे इंटर स्टेट काऊन्सिल सचिव संजीव गुप्ता यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला असून रणबीर शर्मा यांचे वागणे एका गोऱ्या साहेबासारखे असल्याची टीका केली आहे.





























































