Video ये डर अच्छा है, शिवसेनेचा मिंधे सरकारला टोला

सिद्धार्थ उद्यानातील वाघिनीला झालेल्या तीन बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी चिठ्ठी काढून नाव ठरवले जाणार होते. त्यावेळी अजित पवार यांनी काढलेल्या चिठ्ठीत आदित्य नाव आले होते. मात्र सुधीर मुनगंटीवार अजित पवार यांनी काढलेलं नाव न वापरता दुसरं काढण्यास सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी दुसरं नाव काढलं व त्यात विक्रम नाव आलं.

आदित्य नावाच्या चिठ्ठी न वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून शिवसेनेने मिंधे सरकारला टोला लगावला आहे. शिवसेनेने त्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत ”ही भीती चांगली आहे, नावंच फक्त काफी आहे’ अशी कॅप्शन देत मिंधे सरकारला टोला लगावला आहे.

पत्रकारांनी याबाबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना प्रश्न केला असता त्यांनी ”आदित्यला तपळपण्यापासून कुणी रोखू शकत नाही. असाच तिरस्कार करत रहा जेणेकरून आदित्य जास्त तळपेल’ असा टोला लगावला आहे.