ट्रेंड – ‘ती’ आणि 28 गोल्डन रिट्रिवर्स

बंगळुरूमध्ये एक महिला चक्क 28 गोल्डन रिट्रिवर्सना बरोबर घेऊन रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आरटी नगर भागातील हा व्हिडीओ असून त्याची चांगलीच चर्चा होतेय. या व्हिडीओला 7.2 लाख ह्यूज मिळाले आहेत आणि यावर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर व्यक्त होणाऱ्या बऱ्याच लोकांनी या महिलेचं काwतुक केलं असून काहींनी त्यांचे या महिलेबरोबरचे आणि या श्वानांबरोबरचे अनुभवदेखील सांगितले आहेत. ‘28 श्वान, आणि एक मोठं मन. बंगळुरूच्या आरटी नगरमधील ‘श्वानप्रेमी’ कापूंना भेटा!’ अशी पॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ‘मी लहान असल्यापासून या महिलेला आणि श्वानांना पाहत आलो आहे, त्या खूपच चांगल्या व्यक्ती आहेत,’ असे एका युजरने म्हटले आहे.