
अभिनेत्री विद्या बालनच्या ‘जलसा’ या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ‘जलसा’ येत्या 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे फस्ट लुक पोस्टर आज प्रदर्शित झाले. स्त्रीप्रधान कथानक आणि दमदार अभिनय म्हणजे विद्या बालन.
या पंक्तीतील आणखी एक चित्रपट ‘जलसा’च्या रूपाने विद्याच्या नावावर जमा होणार आहे. सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शन केले आहे. विद्याच्या ‘तुम्हारी सलू’चे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. प्राईम व्हिडीओ आणि विद्या बालन यांचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी शकुंतला देवी, शेरनी हे चित्रपट ऍमेझॉनवर प्रदर्शित झाले होते. ‘जलसा’मध्ये शेफाली शाह, मानव कौल, रोहिणी हट्टंगडी, इकबाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन, शफीन पटेल आणि सूर्या कसीभटला या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट नाटय़ आणि थरारपूर्ण असून त्याची कहाणी एकदम हटके असल्याचा दावा करण्यात येत आहे.
























































