व्हिएतनामचं ट्रम्प कुटुंबाला 13 हजार कोटींचं गिफ्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या विदेश दौरे करत आहेत. या दौऱ्यात त्यांना वेगवेगळ्या देशांकडून हजारो कोटींच्या भेटवस्तू मिळत आहेत. गेल्या आठवडय़ात कतार दौऱयावर गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना 3400 कोटी रुपयांचे आलिशान विमान भेट म्हणून देण्यात आले होते. ही भेट स्वीकारून आठवडा होत नाही तोच व्हिएतनामने ट्रम्प कुटुंबाला तब्बल 13 हजार कोटी रुपये किमतीची खास भेट दिली आहे. व्हिएतनामच्या विन्ह फुक प्रांतातील 13,000 कोटी रुपयांचा ‘ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ रिसॉर्ट’ प्रकल्प ट्रम्प यांना भेट म्हणून देण्यात आला आहे. व्हिएतनाम सरकारने या रिसॉर्टला राष्ट्रीय प्राधान्य म्हणून मान्यतासुद्धा दिली आहे. हा प्रकल्प ट्रम्प यांच्या कुटुंबाशी जोडलेला आहे, त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच त्याला मंजुरी देण्यात आली. इतकेच नाही तर इंडोनेशियातील बाली आणि पश्चिम जावा येथे ट्रम्प कुटुंबाला हॉटेल्स व गोल्स कोर्ससारखे प्रोजेक्टसुद्धा ऑफर करण्यात आले आहेत.

तुर्कीत ट्रम्प टॉवर्स

कतार, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांव्यतिरिक्त तुर्की व अझरबैजान यांसारखे देशसुद्धा ट्रम्प यांच्यासमोर पायघडय़ा घालत आहेत. ट्रम्प यांना ऑफर देत आहेत. इस्तंबूल, तुर्की या ठिकाणी ट्रम्प टॉवर्स आणि कार्यालये उभारण्यासाठी मोठे प्रोजेक्ट ट्रम्प यांच्या कुटुंबाला देऊ करण्यात आले आहेत.