हॉटेलमध्ये दरमहा 300 मांजरींचे सूप विकले; पश्चाताप झाल्यावर उचलले हे पाऊल

हिंदुस्थानातील बहुतांश भागात मांसाहारी सुपामध्ये चिकन अथवा मटण सूप शिवजवले जाते आणि ग्राहकांना दिले जाते.  परंतु परदेशातील हॉटेलांमध्ये इतरही प्राणांच्या मांसापासून बनवलेली सूप दिली जातात. चीन आणि वियतनाम या देशात कोंबडी आणि बकऱ्याशिवाय इतर प्राण्यांच्या मांसापासून बनवलेले पदार्थ विकले जातात तसेच त्यांचे मांस वापरून बनवलेली सूपही विकली जातात. वियतनाम येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना मांजरीच्या मांसापासून बनवलेले सूप दिले. मात्र यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे त्याला आपले हॉटेल बंद करावे लागले.

वियतनाममध्ये फाम क्वोक डोन्ह नावाचा व्यक्ती अनेक वर्षांपासून एक हॉटेल चालवत होता. पूर्वी त्याच्या जेवणाच्या पदार्थांची यादी मर्यादीत होती, यामुळे त्याच्या हॉटेलमध्ये फार गर्दी होत नव्हती. कमी उत्पनामुळे त्याला कुटुंब सांभाळणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याने मांजरींची कत्तल करून त्यांच्या मांसाचे सूप विकायला सुरुवात केली. डोन्हच्या हॉटेलमध्ये नवा पदार्थ आल्याचे समजल्यावर ग्राहकांनी त्याच्या हॉटेलमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. व्यवसाय वाढल्याने क्वोक डोन्हला चांगला आर्थिक फायदा होऊ लागला होता.

मांजरींचे सूप बनवण्यासाठी डोन्ह दर दिवशी 10 मांजरींची कत्तल करायचा. दरमहा तो 300 मांजरीना मारायचा.  मांजरीची अशी हत्या करणे त्याला सहन होत नव्हते. पण कुटुंबाच्या पालन पोषणासाठी तो हे काम करत होता. मांजरीना ठार मारणे त्याच्या जीवावर येऊ लागले होते, या पापापासून सुटका कशी होईल याचा तो विचार करत होता. केवळ आपल्या स्वार्थासाठी माजरींची हत्या करणे त्याला पटत नव्हते. म्हणून त्याने मांजरीचे सूप न विकण्याचा निर्णय  घेतला आहे. डिसेंबरमध्ये डोन्हने त्याच्या हॉटेलला कुलूप ठोकले असून त्याने कत्तलीसाठी आणलेल्या 20 मांजरींना मुक्त केले आहे.