विजय साळवी यांना राजरत्न पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेनासाहेब सुभा व हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भेंसले (प्रथम) यांची जयंती व पुण्यतिथी निमित्ताने भोंसले प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱया राजरत्न पुरस्कारांची घोषणा समितीचे अध्यक्ष नागपूर महाराज राजे मुधोजी भोंसले यांनी केली. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना राजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सिनियर भोंसला पॅलेस, महाल, नागपूर येथे या पुरस्काराचे वितरण केले जाईल.

इतिहास आणि साहित्य क्षेत्रात प्रा. विजया मारोतकर, क्रीडा क्षेत्रात सागर कांबळे, संगीत व वादन क्षेत्रात डॉ. संगीता राऊत, पत्रकारिता क्षेत्रातील छायाचित्रकार विनय शुक्ला, वैशिष्टय़पूर्ण कार्यासाठी संदीप शिंदे, 18 वर्षांखालील वयोगटात वैशिष्टय़पूर्ण कार्य क्षेत्रात मधुरा मेहेर, क्रिडा क्षेत्रात क्रिशा रितेश सोनी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब मोरे हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री संपतिया उइके तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी भोंसले (पंचम) उपस्थित राहतील.