काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये टाकू – विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्यसरकार आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. चिमूर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्राचं सरकार हे तीन रिमोटने चाललंय असं म्हणत राज्याच्या तिजोरीची लूट चालली आहे आणि फक्त सत्ताधारी आमदारांचा विकास सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सोबतच त्यांनी काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना जेलमध्ये टाकू आणि चक्की पिसायला लावू असा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.