Video – बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काल लागलेल्या भीषण आगीत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची इमारत राख झाली. आज या ठिकाणी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

चीचपल्ली येथे ही वास्तू उभारली जात आहे. या संपूर्ण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच उदघाटन होण्यापूर्वीच या केंद्राला भीषण आग लागली आणि त्यात केंद्राची मुख्य प्रशासकीय इमारत अर्ध्या तासात बेचिराख झाली.

हे बांबू केंद्र पूर्णपणे बांबूपासून निर्मित असून, बांबूपासून बनवलेली एशियातील ही सर्वात मोठी इमारत होती. या आगीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांनी मागील सरकारच्या कारभारावर गंभीर टीका केली. या बांधकामाला कोणताही दर्जा नाही. बांबूची इमारत असतानाही अग्नीसुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे हे कुणाचे पाप झाकण्यासाठी हे कृत्य केले, असा सवाल करीत या संपूर्ण घटनेची आणि बांधकामाची चौकशी करून दोषींना सोडणार नाही, असे ते म्हणाले.