गेली पाच वर्ष अंथरुनाला खिळून आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीचा सिझन 3 चांगलाच गाजत आहे. अवघ्या तिसऱ्या आठवड्यातच या शो ने चांगलाच जोर पकडला असून तो टीआरपीमध्ये देखील सध्या हिट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेता विकास पाटील याने त्याच्या आयुष्यातील एक भयंकर प्रसंग इतरांसोबत शेअर केला आहे. विकासला एक आठ वर्षांचा मुलगा असून तो गेल्या पाच वर्षांपासून अंथरूनाला खिळलेला आहे.

विकास, मीनल व सोनल एकमेकांशी गप्पा मारत असताना विकासने त्याच्या आयुष्यातील एक भयंकर प्रसंग सांगितला. ‘माझा मुलगा आता आठ वर्षांचा आहे. तो तीन वर्षांचा असताना सोसायटीच्या आवारात खेळत होता. खेळता खेळता तो अचानक तेथील पाण्याच्या टाकीत पडला. त्याला आम्ही वाचवायला पोहचे पर्यंत सात ते आठ मिनीटे तो त्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्याचा त्याच्या शरीरावर परिणाम झाला व तो गेल्या पाच वर्षांपासून अंथरुनावरच असतो. त्याची ट्रिटमेंट सुरू आहे’, असे विकासने यावेळी सांगितले.

विकासने यावेळी त्याच्या पत्नीविषयी देखील सांगितले. ‘मुलामुळे माझ्या पत्नीला देखील घराबाहेर जाता येत नाही. ती पूर्णवेळ त्याच्यासोबत असते. तिचा मला खूप सपोर्ट आहे’, असे विकासने त्याच्या पत्नीविषयी सांगितले.

सध्या या शोमध्ये विशाल निकम, विकास पाटील, जय दुधाने, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार हे स्पर्धक चांगले खेळत आहेत. तसेच उत्कर्ष शिंदे, दादूस, तृप्ती पाटील, स्नेहा वाघ हे देखील त्यांना चांगलीच टक्कर देत आहेत.