विक्रम भट यांनी केले दुसरे लग्न, वर्षभरानंतर शेअर केला फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिल्मफेअर विक्रम भट यांनी श्वेतांबरी सोनी यांच्यासोबत लग्न केले आहे. आज त्यांनी पत्नीच्या वाढदिवशी तिच्यासोबतचा एका फोटो सोशल मीडियावर टाकला असून सोबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधूनच फोटोमधील व्यक्ती ही विक्रम भट यांची पत्नी असल्याचे समोर आले आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार विक्रम भट यांनी गेल्या वर्षी श्वेतांबरी यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय या लग्नाबाबत कुणालाही माहित नव्हतं. विक्रम भट यांनी आज श्वेतांबरी यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

vikram-bhat-new

‘केवळ तु आणि तुच माझं हृदय जिंकू शकली आहे. तु माझं मन चोरलं आहेस हे दाखविण्यासाठी मी ते सर्व करू इच्छितो जे आतापर्यंत मी करायचा विचार करत होतो. Happy Birthday Love. श्वेतांबरी सोनी’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.