व्यापाऱ्याला 30 कोटींचा गंडा विक्रम भट्ट यांना अटक 

राजस्थानच्या उदयपूर येथील एका व्यापाऱयाला 30 कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी हिला राजस्थान पोलिसांनी मुंबईतील यारी रोड येथून अटक केली. पुढील चौकशीसाठी भट्ट दाम्पत्याला ट्रान्झिट रिमांडवर जयपूरला नेले जाणार आहे.

राजस्थानमधील भूपालपुरा पोलीस ठाण्यात प्रसिद्ध डॉक्टर अजय मुराडिया यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून भूपालपुरा पोलिसांनी विक्रम भट्ट त्याची पत्नीसह सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुह्याच्या आधारे पोलीसांनी आज ही कारवाई केली.