
विलेपार्ले पूर्व येथील बाळगोपाळ मित्र मंडळातर्फे माघी गणेशोत्सवानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा सार्वजनिक गणेशोत्सव ‘मुंबईचा पेशवा’ म्हणून प्रसिद्ध आहे. मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. दिपेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ‘साई के दिवाने’ भजन मंडळाने साईबाबांवर आधारित सांगीतिक सेवा सादर केली. गायिका संजीवनी कोरवी यांनी उत्तमोत्तम गीतांचे सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. यावेळी संजीवनी कोरवी व इतर कलाकारांना सन्मानित करण्यात आले.



























































