
द सबर्बन टेबल टेनिस असोसिएशन यांच्यावतीने विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात डॉ. रमेश प्रभू स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन एमएसटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, अरविंद प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. टेबल टेनिसची राज्यस्तरीय स्पर्धा तब्बल 23 वर्षांनंतर मुंबईत होत आहे. 28 जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत मधुरिका पाटकर व सनील शेट्टी हे खेळाडू आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. या स्पर्धेतील विजयी खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. याप्रसंगी टीएसटीटीएचे उपाध्यक्ष धनंजय साठे, चेअरमन योगेश देसाई, सचिव समीर भाटे, कोषाध्यक्ष धनंजय देशमुख, सहसचिव सुहास दांडेकर, गौतम त्रेहन, संकुलनाचे सचिव डॉ. मोहन राणे, कार्यकारी मुख्याधिकारी प्रीतम केसकर व संजीव शहा या मान्यवरांची उपस्थिती होती.





























































