
विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रणित भारतीय विमा कर्मचारी सेना पुरस्कृत शिवसहकार पॅनलच्या 21 च्या 21 उमेदवारांनी दैदिप्यमान विजय संपादन करून विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेवर भगवा फडकवला.
विजयाचा जल्लोष भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योगक्षेमच्या प्रवेशद्वारावर साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना घाटकोपर पश्चिमचे विधानसभा संघटक रविंद्र घाग यांनी भारतीय विमा कर्मचारी सेना व स्थानीय लोकाधिकार समितीचे न्यू इंडिया इन्शुरन्सचे सरचिटणीस दिनेश बोभाटे यांना पेढा भरवून पॅनलमधील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष गोपाळ शेलार, सरचिटणीस महेश लाड, भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष शरद एक्के यावेळी उपस्थित होते.