
मध्यप्रदेश मधील फेम इंडिया-एशिया पोस्टने केलेल्या सर्व्हेमध्ये लोकसभेत जनतेचे प्रश्न उपस्थित करणार्या देशातील 25 निवडक खासदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून प्रभावी आणि अभ्यासपूर्ण प्रश्न मांडलेल्या गटात शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रभावी खासदारांमध्ये खासदार विनायक राऊत यांनी स्थान मिळवल्याबद्दल त्यांचे रविवारी कुडाळ येथे शिवसैनिकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जि.प.गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, पं.स.सदस्य जयभारत पालव, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, माजी पं. स. सदस्य अतुल बंगे, संतोष शिरसाट, संजय भोगटे, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, गणेश भोगटे, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, अवधूत मालणकर, सचिन तेंडुलकर, शैलेश काळप, योगेश काळप, राजन काळप, संदीप म्हाडेश्वर, धिरेंद्र चव्हाण, संतोष अडूरकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



























































