लॉकडाऊनमध्ये खासदार विनायक राऊत यांनी छेडले सूर

2266

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडॉऊन जाहिर करण्यात आला आहे. बाहेर पडू नका घरीच रहा असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. आज गुढीपाडवा असूनही कुणाला घरातून बाहेर पडता आले नाही. घरात बसून कुणी टिव्ही पहातेय तर कोण वर्क अॅट होम करत आहे तर कोण घरातील कामे करण्यात व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे घरी असलेले रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांनीही हर्मोनियमवर सूर छेडताना आपल्या भाच्याला हार्मोनियम वाजवायला शिकवले. घरच्यांसोबत घालवलेले हे क्षण खूप एनर्जी देणारे असल्याचे राऊत यांनी सांगताना कोरोनाला हरवायचं असेल तर १४ एप्रिल पर्यंत घरीच थांबा असा सल्ला दिला. खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आढावाही घेतला होता.सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक कामाशिवाय बाहेर पड़त नाहीत.

खासदार विनायक राऊत हे स्वःता भजनीबुवा आहेत. गणेशोत्सवात त्यांच्या घरी भजनांचा कार्यक्रम असतो त्यावेळी सलग 11 दिवस स्वःता हर्मोनियमवर बसून भजनात सहभागी होतात.आज लॉकडाऊन मुळे खासदार विनायक राऊत यांनी हर्मोनियमवर आपले सूर छेडले.त्यावेळीत घरी असलेल्या भाच्याला त्यांनी हर्मोनियम वाजवायला शिकवला.

गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही खरेदी करता न आल्याने थोडासा हिरमोड झाला असला तरी कोरोना विरूध्दची हि लढाई आहे हे ओळखून अनेकांनी घरातून सोशल मिडिया वरून शुभेच्छा देताना घरीच रहा स्वस्थ रहा असे जनजागृतीपर संदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या