दोन तोडांचा दुर्मिळ साप पाहिलात का? 

तुम्ही कधी दोन तोडांचा साप पाहिला आहे का? जर नाही तर पाहाच. सध्या सोशल मीडियावर एक सापाचा फोटो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा दोन तोंडे असलेला दुर्मिळ साप पश्चिम बंगालमधील बेलदा फॉरेस्ट रेंजच्या एकरुखी गावात दिसला आहे. लोकांना याची माहिती मिळताच साप पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली. एवढेच नाही तर लोकांनी या सापाला पिण्यासाठी ताटामध्ये दूधही ठेवले होते. सध्या हा साप वनविभागाच्या चमूच्या संरक्षणाखाली आहे. हे फोटो वृत्तसंस्था एएनआयने 11 डिसेंबरला आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या