
चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओत चिमुकली खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. ‘सोजा जरा’ गाण्यावरील तिचे चेहऱयावरील हावभाव बघण्यासारखे आहेत. इतक्या लहान वयात इतके सुंदर हावभाव करणाऱया चिमुकलीवर नेटिजन्स भलतेच खूश झाले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @zakasss_memer या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो लाइक्स आणि ह्यूज मिळाल्या आहेत. असाच आणखी एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्यावर ही मुलगी दिलखेचक नृत्य करत आहे. तिच्या अदा आणि डान्स स्टेप्स भन्नाट आहेत. @teambarkatarora या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या दोन्ही व्हिडीओंना भरभरून प्रतिसाद आणि कमेंट्स मिळत आहेत.