
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत ना एखादा अभिनेता आहे ना इन्फ्लुएंसर. पण तरीही लाखो लोकांचे लक्ष त्याने वेधून घेतले आहे. व्हिडीओचा ‘हीरो’ आहे एक लहान गोंडस हत्तीचं पिल्लू, जे थेट एका कॅफेमध्ये ग्राहक बनून येते. सुरुवातीला सगळ्यांना भीती वाटते, सगळे गोंधळतात आणि शांतता असते. पण काही क्षणातच सारे रिलॅक्स होतात. तो लहान हत्ती अगदी शांत, मासूम आणि गोंडसपणे उभा असतो. तो कोणालाही त्रास देत नाही, कोणतीही तोडफोड करत नाही. कॅफेमधील एक व्यक्ती त्याला प्रेमाने दूध देतो. हत्ती दूध आवडीने पितो. व्हायरल व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जंगले कमी होत असल्यामुळे असे प्रसंग वाढतायत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


























































